
Mr.S. D .Dawkhar
Deputy Registrar
Affiliation Section
नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेचे प्रस्ताव देण्यासाठी
- नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठी प्रस्ताव देण्यापूर्वी कृपया बृहत आराखाड्याचे अवलोकन करून घ्यावे. बृहत आराखड्या नुसारच प्रस्ताव स्वीकारले जातील.
- बृहत आराखडा /शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी नवीन महाविद्यालय/संशोधन संस्था सुरु करण्याकारीताचे बिंदू/ठिकाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा , छापुन हवा असल्यास प्रिंटरच्या चिन्हावर क्लिक करा.
- संलग्नीकरण शुल्क बाबतच्या माहिती
नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठी अर्जाचे शुल्क- New College of Arts, Science, Commerce: Rs. 500
- New College of Engineering, Architecture & Pharmacy: Rs.1500.
- New Recognized Institution(Management)/Research Center: Rs. 2000.
- संलग्नीकरण शुल्क व त्या बाबतच्या माहितीसाठी ही फाइल डाउनलोड करा Amended Ordinance 169 वाचा
- संलग्नीकरण शुल्क व त्या बाबतच्या माहितीसाठी ही फाइल डाउनलोड करा Ordinance 169 वाचा
- नवीन महाविद्यालय /संशोधन संस्था प्रस्तावासठी आवश्यक ती कागदपत्रे
- संस्थेचे नोंदणी पत्र (Oragnization's registration documents)
- संस्थेची घटना
- संस्थेची पदाधिकारी यादी
- जेथे महाविद्यालय सुरू करावयाचे आहे त्या जागेची कागदपत्रे (उदा. सात/बारा , प्लॉटचा माप, मालकी हक्काची कागद पत्रे )
- संस्थेचा आर्थिक ताळेबंद (बॅलेन्स शीट)(Balance Sheet)
-
ऑनलाइन प्रोसीजर
संलग्निकरण प्रक्रिया(Affiliation Process) पूर्णतः मराठीतूनच आहे .
सर्व फॉर्म मराठीतूनच भरायचे आहेत. - शासन निर्णय क्र. एन जी सी २०१७/(२०८/१७)/मशि ४ दि.१३ सप्टेंबर , २०१७ - सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम ,विषय,विद्याशाखा,अतिरिक्त तुकड्यांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजुरी देण्यासाठी कार्यपद्धती व निकष .
- जी. आर. पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
- शासन निर्णय क्र. एन जी सी २०१७/ (२९/१७)/मशि ४ दि. १५ सप्टेंबर , २०१७ - सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजुरी देण्यासाठी कार्यपद्धती व निकष .
- जी. आर. पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
- शासन निर्णय क्र. एन जी सी २०१२/ (२४७/१२)/मशि ४ दि. २ सप्टेंबर , २०१३ च्या निर्देशानुसार नवीन व जुन्या महाविद्यालयांच्या संलग्निकरन प्रक्रियेत झालेले बदल .
- जी. आर. पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
- शासन निर्णय क्र. एन जी सी २०१०/ (१९३/१०)/मशि ४ दि. ३० ऑक्टोबर , २०१० च्या निर्देशानुसार नवीन व जुन्या महाविद्यालयांच्या संलग्निकरन प्रक्रियेत झालेले बदल .
- जी. आर. पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
- शासन निर्णय क्र. एन जी सी २००९/ (३०१/०९)/मशि ४ दि. २५ सप्टेंबर , २००९ च्या निर्देशानुसार नवीन व जुन्या महाविद्यालयांच्या संलग्निकरन प्रक्रियेत काही बदल होणार आहेत .
- जी. आर. पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
- या वर्षीचे प्रस्ताव देताना सोबत जोडावयाची व्हिडिओ सीडी(VCD) जोडायची आहे .
- व्हिडिओ सीडीचा(VCD) तपशिल:
- या व्हिडिओ सीडी(VCD) मध्ये महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचे चित्रीकरण केलेले असावे.
- तसेच या सीडी मध्ये महविद्यालयातील कर्मचारी व शिक्षकांचे चित्रीकरण असावे. व्हिडिओ सीडी(VCD) देताना ती दोन प्रतीत द्यावी.
- व्हिडिओ सीडीच द्यावी. डी.व्हि.डी. अथवा इतर कुठलाही प्रकार देऊ नये.
-
Sample Format/नमूना फॉर्म
- नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठीचे प्रस्ताव देण्यापूर्वी आपणास वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे
- नोंदणी करतानाच आपणास प्रस्तावित महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठीचे ठिकाण व विद्याशाखा निवडावायाची आहे . ही विद्याशाखा व ठिकाण पुन्हा बदलता येत नाही.
- नोंदणी करताना आपणास ईमेल चा उल्लेख करावयाचा आहे. हा ईमेल अस्तित्वात असलेलच हवा. काल्पनिक असु नये.
- नोंदणी चा फॉर्म भरताना आपणास आपल्या आवडीचे यूज़र नेम व पासवर्ड द्यावयाचे आहे. नोंदणीचाफॉर्म व्यवस्थितरित्या भरल्यानंतर सबमीट या बटन वर क्लिक करावयाचे आहे.
- अकाउंट अक्टीवेट झाल्या नंतर आत दिललेले सर्व फॉर्म व्यवस्थित भरा.
- ऑन लाईन भरावयाची माहिती टप्प्या टप्प्याने भरावयाची सुविधा उपलब्ध असल्याने आपले यूज़र नेम आणि पासवर्ड कायम लक्षात ठेवा. आपण जी माहिती पुर्वी भरली आहे त्यानंतरची माहिती भरण्यासाठी यूज़र नेम व पासवर्ड टाइप करून आपण पुढील माहिती भरू शकता. अर्जातील सर्व माहिती मान्यतेच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे ऑन लाईन द्वारे विहित नमुन्यातील सर्व माहिती अचूक, योग्य व काळजी पूर्वक भरावी.
- संलग्नीकरण शुल्क व अर्जाचे शुल्क एकत्रित रित्या चलन पद्धतीने भरावेत. डीडी पद्धत बंद करण्यात आली आहे.
- ऑन लाईन द्वारे सम्पूर्ण माहिती भरून झाल्या नंतर प्रिंट घेण्यासाठी सुविधा सम्पूर्ण माहितीच्या अखेरीस उपलब्ध करून दिली असून तेथून प्रिंट घेऊन, आवश्यक सर्व कागद पत्रांच्या सत्य प्रती सोबत जोडुन दि.१५ जानेवारी पुर्वी शैक्षणिक विभागात ३ प्रतीत सादर करावा.